त्या नराधमाला भर चौकात फासावर लटकवा

19 Nov 2025 17:58:08
मालेगाव,
goldsmiths association संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणार्‍या नाशीक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका साडेतीन वर्षीय निरागस चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणार्‍या आरोपीला भर चौकात फासावर लटकवा अशी संताजपजनक मागणी सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनतर्फे जाहीर निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
 
 

goldsmith  
 
 
याबाबत सविस्तर असे की, नाशीक जिल्ह्यातील मालेगाव तालुयातील डोंगराळे गावात विजय संजय खैरनार या चोवीसी वर्षीय नराधमाने एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैगीक अत्याचार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेबाबात संपूर्ण देशभरात तीव्र संताप लाट उसळली आहे. अशा विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला कुठलीही दयामया न दाखविता भर चौकात फासावर लटकावे, जेणे करुन अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमध्ये दहशत निर्माण होवून अशा कृत्याला आळा बसेल.
सदर घटना मानवी समाजाला काळीमा फासणारी असून, या घटनेचा आम्ही पुर्णपणे निषेध करतो. असे आरोपी आपल्या देशाच्या भवितव्यासाठी व उज्वल भविष्यासाठी धोकादायक आहेत.goldsmiths association अशा आरोपीला कोणत्याही प्रकारची दया माया न दाखवता या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मालेगाव येथील सुवर्णकार समाज बांधव व सराफा असोशिएशनच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी तालुक्यातील व शहरातील सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0