चंद्रकांत लोहाणा
वाशीम,
parshvanath jain temple वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुयार्तंगत येत असलेल्या शिरपूर जैन येथील जैन समाजबांधवाची काशी म्हणून ओळख असलेल्या जगप्रसिध्द श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या मागील भागात असलेल्या जुन्या धर्मशाळेच्या दोन खोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू असतांना तळघरात (तळमजला) जैन डिंगर समुदायाच्या लाखो वर्षे जुन्या लहान-मोठ्या प्राचीन मूर्ती सापडल्या. अशी तीर्थ रक्षक आयल्क श्री १०५ सिद्धांत सागरजी महाराज आणि तात्याभैया यांनी दिली.
याबाबत सविस्तर असे की, मंदिरासमोरील पूजा मंडपाच्या मागे, हजारो वर्षे जुनी डिंगर जैन धर्मशाळा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये पहिल्या दोन खोल्यांचे नूतनीकरण करून येथे कार्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने या धर्मशाळेच्या नुतणीकरणाचे काम हाती घेण्यात आाले. या दरम्यान, या खोलीची स्वच्छता करताना एका ठिकाणी लाकडी आवरण आढळले. हे आवरण काढल्यानंतर तळघरात काही जैन डिंगर मूर्ती दिसल्या. खोलीच्या आत पाहिल्यानंतर या तळघरात प्रवेश करण्यासाठी पायर्या देखील दिसल्या. या पायर्यांमधून आत गेल्यावर येथे शेकडो लहान - मोठ्या डिंगर जैन मूर्ती सापडल्या. यापैकी काही मूर्ती इसवी सन १३६५, १४६० आणि १४६१ सालातील आहेत. सापडलेल्या मुर्तींपैकी ५३ मूर्ती मोठ्या आहेत, त्यापैकी बहुतेक भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या प्रतिकृती आहेत आणि इतर मूर्ती भगवान शांतीनाथ आणि इतर तीर्थकारांच्या आहेत.
अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या आवारात एक नवीन विशाल तळघर सापडले. हे तळघर सुमारे तीन पिढ्यांपासून पुरले गेले होते. शेकडो वर्षे प्राचीन असलेले हे तळघर उघडल्यानंतर ६०० वर्षांहून अधिक जुन्या ३१ आणि इतर शेकडो लहान मूर्ती सापडल्या. सदर मुर्त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या प्राचीन दिगंबर जैन धर्माचा इतिहास स्पष्टपणे सांगते. शिरपूर येथे असलेले श्री अंतरिक्ष पार्श्वनाथाचे ऐतिहासिक मंदिर वाशीमपासून फक्त २० किमी अंतरावर आहे. पौराणिक आणि प्राचीन अंतरिक्ष पावली मंदिर हे भारतातील जैन समुदायाचे तीर्थक्षेत्र आहेत. या अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात जमिनीपासून वर अंतराळात हवेत विराजमान असलेली भगवान पार्श्वनाथाची मूर्ती स्वतःच अद्वितीय आहे.parshvanath jain temple असे म्हटले जाते की ही मूर्ती हवेत इतकी उंच होती की घोडेस्वार त्याखाली सहज जाऊ शकत होता. कालांतराने ही दरी कमी झाली. पौराणिक कथा आणि इतिहासकारांच्या मते, ही चमत्कारिक मूर्ती चौथ्या काळातील असल्याचे सिद्ध होते. शिरपूर येथील पावली मंदिराबद्दल असे मानले जाते की १० व्या शतकात तपमूर्ती दिगंबर मुनीश्री वीरचंदजी महाराज ध्यानस्थ, आत्मचिंतनात बसले होते. या वेळी गोपाळ नावाचा एक गोपाळ तेथे आला आणि त्याने महाराजांना भक्तीने नमस्कार केला आणि त्यांची कथा सांगितली. आजही ते अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन पावली मंदिर म्हणून ओळखले जाते. येथील विहिरीचे पाणी अनेक त्वचारोग बरे करते. आधुनिक विज्ञान हे सत्य मान्य करेल किंवा करणार नाही, परंतु हे खरे आहे की आजही दूरवरून येणारे भाविक या विहिरीचे पाणी औषध मानून घेतात आणि त्याचा लाभ घेतात. १४०६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आल्याची माहिती तात्याभैय्या यांनी दिली. येथील तळघरात सापडलेल्या जैन मूर्तीमुळे भाविक दररोज मोठ्या संख्येने श्रद्धेने आणि भक्तीने दर्शनासाठी येत आहेत.