प्रत्येकाने स्वदेशी हे व्रत स्वीकारावे : भिडे

19 Nov 2025 15:07:52
आर्वी,
dhananjay bhide देश हा सर्वपरी असून प्रत्येक भारतीयांनी स्वदेशी हे व्रत म्हणून स्वीकारावे असे आवाहन स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय भिडे यांनी केले. स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालय येथे स्वदेशी जागरण मंचच्या वतीने राष्ट्रऋषी दंतोपंत ठेंगडी यांच्या जन्मदिन सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका संघ चालक रमेश नागोसे, जिल्हा संयोजक शशांक नानोटे यांची उपस्थिती होती. प्राध्यापक धनंजय भिडे पुढे म्हणाले की, पूर्वी आपला व्यापार गॅटच्या माध्यमातून चालत होता.
 

धनंजय भिडे 
 
 
स्वदेशी हे फार कठीण व्रत आहे. प्रत्येक भारतीयांनी स्वदेशी हे व्रत म्हणून स्वीकारावे. संघ ही समाजाची संघटना आहे. जगामध्ये डब्ल्यूटीओच्या माध्यमातून जागतिक व्यापाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला पिळण्याचे काम केले गेले. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी जागतिक व्यापाराच्या सबसिडी या प्रकाराला विरोध केला. दंतोपंतांनी काही तरुणांना एकत्र करून अभावीप, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघाची स्थापना केली. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली त्यामध्ये देखील दत्तोपंतांचा सक्रिय सहभाग होता. दंतोपंतांची मूळ ओळख संघ म्हणून आहे. स्वदेशी जागरण मंचानी जागृत राहून आर्थिक व्यवस्थेवर लक्ष देणे तसेच जेनेरिक औषधी निर्मितीत स्वदेशी जागरण मंचाचा सहभाग आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यत केले.dhananjay bhide डॉ. विनय देशपांडे यांनी स्वदेशीचा वापर आपल्या घरापासून करावा असे आवाहन केले. धनंजय भिडे यांनी येथील स्वदेशी वस्तू विक्री केंद्राला भेट दिली. यावेळी संचालक शुभांगी पारसे, सुनील पारसे, प्रवीण सरोदे आदींनी स्वदेशी वस्तू बद्दल माहिती दिली. प्रास्ताविक स्नेहल देशमुख यांनी केले. आभार अ‍ॅड. अविनाश चौधरी यांनी मानले.
 
 
Powered By Sangraha 9.0