चिमुकलीवर अत्याचार करणार्‍याला फाशी द्या

19 Nov 2025 16:24:25
अमरावती,
abused the child मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुकलीसोबत अत्याचार करणार्‍या व तिला मारून टाकणार्‍या मारेकर्‍याला फाशीची शिक्षा द्यावी याकरिता अमरावती जिल्हाधिकारी यांना समस्त सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवेदन दिले. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील सोनार समाजातील चिमुकलीवर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली. या घटनेची पोलिसांनी तातडीने तपास करून पिडित मुलीला व तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा याकरिता समस्त सोनार समाजातील ज्येष्ठ बंधू, भगिनी, युवकांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिले.
 
 

सोनार समाजा 
 
 
 
निवेदनामध्ये ज्याना नराधमाने त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला व तिला ठार मारून टाकले त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात राज्यव्यापी आंदोलन उभारू असे सुद्धा यावेळी समाज बांधवांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले.abused the child यावेळी श्री नरहरी माळवी सोनार संघाचे अध्यक्ष राजेश अनासाने, उपाध्यक्ष विनोद गुहे, राजेंद्र धरमठोक, सचिव प्रा. रवींद्र प्रांजळे, कोषाध्यक्ष नितीन खांडेकर, सहसचिव मंगेश नेरेकर, अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाचे सराफा अध्यक्ष अजय तीनखेडे, निलेश मरोडकर, वैश्य सोनार संघटनेचे दिलीप दाभाडे, प्रकाश तारेकर नंदकिशोर गुंबळे, अरविंद विंचुरकर विनायक चेडे, नारायण नेरकर, किरण विंचुरकर, नितीन शेरेकर, नरेंद्र शेरेकर, निलेश गुहे, अशोक विंचुरकर, अरुण मांडळे, दिनेश परांजपे, प्रमोद तारेकर, सुनील शिराळेकर, गजानन नांदुरकर, जोशना हिरुळकर, प्राजक्ता बानूवाकोडे, अनिता अनासाने, अर्चना खांडेकर, पल्लवी अनासाने, मयुरी पाटणे, आरती बैतुले, विना हिरूळकर, प्रीती बुटे, स्वाती अस्तुलकर, अपर्णा हाडे यांच्यासह समस्त सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0