वर्धा,
wardha-news : नेहमीचि येतो पावसाळा नुसार वर्धा नगर पालिका क्षेत्रात गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये परस्पर राजकीय विरोधात उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवण्यात येतात आणि ज्याच्याविरोधात आक्षेप घेतल्या जातो. आक्षेप हा आक्षेपच राहतो आणि ज्याच्या विरोधात आक्षेप नोंदवला जातो ते निवडणुकीत उतरतात आणि निवडूनही येतात. यावेळीही तिच उजळणी झाली. रात्री उशिरापर्यंत युतिवाद झाला आणि आक्षेप पुन्हा कुचकामी ठरला.

रामनगर परिसरातील भाजपाचे नेते, नपचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांना यावेळी नगर पालिकेसाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच प्रभागातील अपक्ष उमेदवार महेश तेलरांधे यांनी नगर पालिकेकडे ठाकूर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला. काल १८ रोजी उमेदवारी अर्जावर आक्षेप आणि छाननी प्रक्रीयेत ठाकूर विरुद्ध तेलरांधे हा विषय पटलावर आला. दोन्ही गटाकडून युतिवाद करण्यासाठी नागपूर येथील दिग्गज वकिलांना वर्धेत आणल्या गेले. काल सायंकाळनंतर वर्धेतील राजकारणात ठाकूर विरुद्ध तेलरांधे हाच विषय चर्चील्या गेला. या विषयावरील निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. रात्री उशिरापर्यंत नगर पालिकेत युतिवाद सुरू होता. अखेर, मध्यरात्री अडीच वाजता ठाकूर यांच्या बाजूने निकाल देण्यात आल्याने ठाकूर यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
देवळीत सन २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीची २०२५ च्या निवडणुकीत आठवन झाली. २०१६ मध्ये देवळी नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले होते. भाजपाला २ तर काँग्रेसला एक स्वीकृत सदस्य घ्यायचा होता. काँग्रेसकडुन सुरेेश वैद्य यांचे नाव देण्यात आले होते. परंतु, स्वीकृत सदस्यपद देण्यासाठी निवडणूक विभागाहच्या नियमांचे उल्लंघन वैद्य यांच्याकडून झाले होते. त्या विरोधात माजी खासदार रामदास तडस यांचे चिरंजिव पंकज तडस यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. नागपूरचे प्रसिद्ध वकील फिरदोश फिर्झा यांनी तडस यांची बाजू मांडली. त्यावेळी वैद्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येऊन तडस यांना १ लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते. सन २०१६ मध्ये झालेला घटनाक्रम देवळीतील नागरिक विसरले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या नप उमेदवारी अर्जातील घडामोडींनी २०१६ आठवन ताजी केली.
यावेळी मात्र, वैद्य यांचा अर्ज कायम राहिला आहे. काँग्रेसच्या वतीने सासरा सुरेश वैद्य व सून प्रांजली शशांक वैद्य यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर यातील एक नामांकन अगदी वेळेवर बाद करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या १७ नोव्हेंबरच्या मार्गदर्शकसुचनांनुसार काँग्रेसचे दोन्ही नामांकन स्वीकारण्यात आले होते. परंतु, मंगळवारी निवडणूक आयोगाचा दुसरा निर्णय धडकला. एकाच पक्षाचे किंवा व्यक्तीची दोन नामांकने असल्यास यातील डमी नामांकनाला पाच सूचकांची अट घालण्यात आली. परंतु, प्रांजली वैद्य यांच्या नामांकन अर्जात १७ नोव्हेंबरच्या निर्णयानुसार एकच सूचक टाकल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. दुसर्या प्रकरणात काँग्रेसचे प्रमुख उमेदवार सुरेश वैद्य यांना कोर्टाच्या आदेशानुसार एक लाखाचा दंड झाल्याचा मुद्दा उपस्थित करून पंकज तडस यांनी आक्षेप नोंदविला. वैद्य यांनी त्यांच्या नामांकन पत्रातील शपथपत्रामध्ये या बाबीचा उल्लेख न केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु, यावेळी निवडणूक निर्णय आधिकारी स्नेहा क्षीरसागर यांनी तडस यांच्या आक्षेप गुन्हेगारी संदर्भातील नसल्याचे कारण देऊन वैद्य यांचे नामांकन मान्य केले.