काँग्रेस मधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

19 Nov 2025 16:29:26
दर्यापूर,
party dispute in congress एकाच प्रभागात दोघांना एबी फॉर्म देत काँग्रेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीमध्ये प्रभाग क्र. २ मधील काँग्रेचे अधिकृत उमेदवार असलेल्या देविदास काळे यांचा फॉर्म रद्द ठरविण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी यादीत प्रभाग क्र. २ मध्ये येथील प्रतिष्ठित असलेले देविदास काळे यांना उमेदवारी घोषित झाली होती. पक्षाने त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला. त्यानुसार अर्ज भरण्यात आला.
 
 
 
काँग्रेस
 
 
मात्र वेळेवर त्याच प्रभागात दुसर्‍या व्यक्तीला एबी फॉर्म दिल्याने अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाला असल्याने या विषयी खमंग चर्चा शहरात उमटत आहे. दर्यापूर पालिकेत एकूण २५ नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने काँग्रेस पक्षाने सर्व २५ अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यानुसार सर्वांनी अर्ज भरले. मात्र, पुन्हा अमरावती येथील वरिष्ठांनी आपल्या जवळचा म्हणनू नवा एबी फॉर्म जारी करत पाठबळ दिले. यामुळे पक्षांतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आल्याने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.party dispute in congress आज नगर पालिकेत अर्ज छाननी वेळी काँग्रेच्या देविदास काळे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. विशेष म्हणजे देविदास काळे हे वयाच्या ७५ पोहोचले आहे. यावर आता काँग्रेस पक्षातील श्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर लक्ष लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0