वर्धा,
mahakali-dhamtirth : महाकाली धामतीर्थ येथे रविवार १६ रोजी ४० दिवसीय अखंड ज्योतीची समाप्ती व घटविसर्जन करण्यात आले. यावेळी कुडकुडत्या थंडीत परिसरातील हजारो भत सहभागी झाले होते. ओल्या कपड्यांनीच या अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची परंपरा असल्याने थंडीची तमा न बाळगता देवी भतांनी अखंड ज्योती विसर्जन सोहळ्यात श्रद्धेने सहभाग घेतला.

यावेळी पं. शंकरप्रसाद व शिवकुमारी अग्निहोत्री यांच्या हस्ते त्रिदेविंचे अष्टांग योग पूजन, होम, हवन पूजा करण्यात आले. यावेळी अखंड ज्योतीची सांगता करून लगतच्या नदीपात्रात घटविसर्जन करण्यात आले. यावेळी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी अखंड ज्योतीचे महात्म्य विशद करताना पहिली ज्योती. कर्म ज्योती म्हणजे कर्माची प्रकाश-यात्रा किंवा कर्म-मार्गाचा उजाळा, जिथे प्रत्येकाने आपल्या कामात प्रकाशमान, पारदर्शक आणि सकारात्मक राहावे, असा संदेश आहे. दुसरी ज्योती ज्ञान ज्योती. ज्ञान, विवेक, शिक्षण आणि बोधाचा तेजस्वी प्रकाश समाज आणि व्यक्तीच्या प्रगतीचा मुख्य स्त्रोत. ज्ञान ज्योती म्हणजे जीवनातील प्रत्येक अज्ञानाचे अंधार दूर करणारा दिवा आहे. भक्ती ज्योती हा धर्म, अध्यात्म आणि संतसाहित्याचा विशिष्ट शब्द आहे जो भक्तीमार्गातील दिव्य प्रेरणेचे व भक्ताचे परमात्म्यातील एकत्व दर्शवतो.
भक्तीच्या या ज्योतीमुळे भक्ताचा आत्मा आणि भाविनी चेतना जागृत होतात. चौथी ज्योती म्हणजे आत्म ज्योती. ही आध्यात्मिक आणि तात्त्विक संकल्पना आहे. ज्याचा अर्थ आहे आत्म्याची प्रकाशमय स्वरूप किंवा आत्मा ज्योतिस्वरूप आहे. आत्मा हा सत्य, चेतना आणि आनंदाचा स्वरूप असतो. आत्म ज्योती म्हणजे ती ज्योती जी आपल्या अंतरंगात असते, जी अज्ञान आणि मोहाला दूर करते आणि ज्याला अनुभवून मनुष्याला मोक्षसाधना होते. पाचवी विवेक ज्योती हे एक प्रकारचे आध्यात्मिक प्रकाशमान किंवा जागृततेचे प्रतीक मानले जाते. जो मोक्षप्राप्ती आणि दार्शनिक समज वाढवतो असे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन अग्निहोत्री, जगदीश तिवारी, बिमल तिवारी, बाबुलाल दिग्रसे, राघोबा कोरडे, चंद्रभान आसोले, अनिल बोडखे, बाबाराव महाजन, अभिजित रघुवंशी, गणेश काळे यांच्यासह अनेक माई भतांची उपस्थिती होती.