अमरावती,
amaravati-news : शिवसेना उबाठाला मोठे खिंडार पडले असून अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीत मार्गदर्शक सुनील राणा यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला हा जोरदार धक्का आहे.
अंजनगाव सुर्जी उबाठा गटाच्या माजी शहराध्यक्षा रजनी प्रशांत पाटील तसेच आ. गजानन लवटे यांचे पुतणे चंद्रकांत ऊर्फ बंटी लवटे, सिमा तायडे, पुजा रॉय, अमोल कावरे, सुशमा व्यवहारे, संजय नाठे, कोमल इंगळे, दिलीप आवंडकर यांच्यासह चांदूर बाजार येथील कुलदीप प्रदीप शर्मा यांचा जाहीर प्रवेश युवा स्वाभिमान पार्टीमध्ये झाला आहे. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रवेशाने युवा स्वाभिमान पार्टीच्या शक्तीवर्धनाला आणखी जोर मिळाला आहे. राजापेठ येथील मुख्य कार्यालयात हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार येथील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बंटी लवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुनील राणा यावेळी म्हणाले, युवा स्वाभिमान पार्टी वेगाने जनतेच्या मनात पोहोचत आहे. उद्योग, शिक्षण, युवा सबलीकरण व गावागावातील विकासकामांसाठी कटिबद्ध आहे. या प्रवेशानंतर अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार येथे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रवेशाप्रसंगी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष निळकंठ कात्रे, सचिव जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, प्रा. अजय गाडे, हरिश चरपे, गंगाधर आवारे, जिल्हाध्यक्ष अजय देशमुख, आशिष कावरे, अजय घुले, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, मंगेश कोकाटे, पवन हिंगणे, निलेश देशमुख, जिवन चर्हाटे, सुवर्णा चर्हाटे, संजय नाठे, मयुर श्रीवास्तव, गौरव व्यवहारे, देवेंद्र व्यवहारे, लतिका लाडोळे, भावना नांदरेकर, सागर दायमा, डॉ.राहुल अहिर, सुबोध वासनकर यांच्यासह असंख्य समर्थक उपस्थित होते.