तभा वृत्तसेवा
पुसद,
Mount Litra Zee School : माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, माजी सचिव प्रेस क्लब ऑफ इंडिया पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचे विचार व मार्गदर्शन मिळावे हा दूरदृष्टीकोन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रवी ग्यानचंदानी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असे सांगितले. आई, वडिलांचे महत्व, पर्यावरणविषयक जागृती, गुरुकुल शिक्षण पद्धतीचे महत्त्व, गुरुकुल शिक्षण पद्धतीत ज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. भारतीय संस्कृतीचे महत्त्व अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समन्वय, प्रशासन अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व कर्मचाèयांनी परिश्रम घेतले. संचालन आकाश खंदारे यांनी केले. आभार सुनील सोमकुवर यांनी मानले.