भंडारा,
mridul verma भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तरुण गायक मृदुल वर्मा यांनी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) त्यांची निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी आयोजित केलेल्या ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीसाठी देशभरातून चित्रपट निर्माण क्षेत्रातील 100 प्रतिभांची निवड करण्यात आली आहे. मृदुल वर्मा यांनी पार्श्वगायन श्रेणीत स्थान मिळवले आहे.
मृदुल वर्मा गेल्या एक दशकापासून संगीत आणि गायन क्षेत्रात सक्रिय आहेत. 2018 मध्ये त्यांनी पद्मविभूषण आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा अली खान यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. त्यांनी मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये असंख्य लाईव्ह परफॉर्मन्स दिले आहेत. या स्पर्धेत मृदुल वर्मा यांनी त्यांच्या ‘सताओगे’ या गाण्यासाठी पार्श्वगायन श्रेणीत स्थान मिळवले. माहितीनुसार, या स्पधेर्साठी देशभरातून मोठ्या संख्येने नामांकने आली होती, ज्यामधून 100 तरुण कलाकारांची निवड करण्यात आली आहे.mridul verma हे उल्लेखनीय आहे की मृदुलचा धाकटा भाऊ मृगांक वर्मा यांनी 2022 मध्ये झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म एडिटिंग’ श्रेणीत विजय मिळविला होता. त्यांनी संपादित केलेल्या ‘डियर डायरी’ या चित्रपटाने 53 तासांच्या चित्रपट निर्मिती आव्हानात प्रथम क्रमांक पटकावला होता. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ साठी भंडारा जिल्ह्यातील प्रतिभेची दुसऱ्यांदा निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे.