वर्धा,
municipal-council-elections : जिल्ह्यात सहा पालिकांची निवडणुकीसाठीचे वातावरण ११ अंशावर पारा स्थिरावला असताना तापायला लागले आहे. जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया पार पडली. आता अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू झाली आहे. २१ रोजी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतरच निवडणुकीच्या मैदानात कोण आणि कोणाची न लढताच माघार हे स्पष्ट होईल.

वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी आणि सिंदी (रेल्वे) येथील नगरपरिषदेची २ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. सर्व नगर पालिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत वाद झाल्याने अपक्षाचे बंड अनेकांनी उभारले. पक्षावरील नाराजीतून काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध दंड थोपटले आहे. बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष संजय गाते आणि माजी खासदार सुरेश वाघमारे नाराज अपक्ष नगराध्यक्षपदासाठी अर्ज करणार्यांसोबत चर्चा करणार आहेत. विरोधकांमध्ये फारशी बंडखोरी नसली तरी महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आर्वीत काँग्रेसचा सफाया करण्यात खासदार अमर काळे यांना यश आल्याने तिथे नवीनच प्रश्न उभा ठाकला आहे. वर्धेतही काँग्रेसकडून जवळपास १७ प्रभागांमध्ये काँगे्रसचे उमेदवारच नसल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधार्यांना होण्याची शयता नाकारता येत नाही.
१७२ जागांसाठी रणसंग्राम
सहा नगरपालिकांमध्ये ६ नगराध्यक्ष आणि १६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. १७२ जागांकरिता ही निवडणूक होत आहे. ६ नगराध्यक्षांकरिता ७२ तर १६६ नगरसेवकांकरिता १ हजारांवर अर्ज आले. वर्धेत भाजपाकडून ४० अधिक १ नगराध्यक्ष असे ४१ उमेदवार मैदानात आहेत.