तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
rajendra-gaikwad : होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) कडून नप अध्यक्षांसह 38 जागांवर उमेदवार दिले आहे. ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, जिल्हा सचिव तुषार देशमुख, नगर परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार वैष्णवी कोवे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पना दरवई, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, शहर प्रमुख चेतन शिरसाट उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढविणार होतो. यासाठी उबाठाला नप अध्यक्ष व 38 जागा मागण्यात आल्या. मात्र, काँग्रेसकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावरच लढणार आहे. शिवसेनच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे, त्यांची पक्षाकडे तक्रार करणार आहे. यापूर्वीसुद्धा यवतमाळ नगर परिषदेवर शिवसेना (उबाठा)चे अध्यक्ष होते. त्यामुळे नगर परिषदेचे अध्यक्ष हे उबाठाकडेच पाहिजे होते. काँग्रेस पक्षाकडून जर अध्यक्षपद व इतर 38 जागा उबाठाला देत असेल तर आम्ही काही प्रमाणात तडजोड करू अन्यथा स्वबळावरच निवडणूक लढू, असे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
पक्षासोबत गद्दारी करणाèयांची तक्रार
काही पक्षातील पदाधिकाèयांनी पक्षासोबत गद्दारी करत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार उभे केले आहे. ही पक्षासोबत एकप्रकारची गद्दारीच आहे. त्यामुळे लवकरच पक्ष प्रमुखांकडे याबाबत तक्रार करणार असून, संबंधित पदाधिकाèयांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.