नागपूर,
Nagpur News हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार युगल गीतांना समर्पित ‘युगल गीतों का नज़राना’ हा कराओके संगीतमय कार्यक्रम वैशु’ म्युज़िकल वर्ल्डतर्फे मोर भवनच्या ‘नटराज’ सभागृहात आयोजित करण्यात आला. शहरातील परिचित कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला.
संचालिका वैशाली मदारे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली व उपस्थित कलाकार व प्रेक्षकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपअभियंता शिवदत्त खंडेनाथ आणि विज्ञान शिक्षाविद् विजय मोहाडीकर होते. प्रस्तावना राज चौधरी यांनी केली तर मोहम्मद रफी यांच्या ‘एक हसीं शाम को’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. Nagpur News कार्यक्रमात कलाकारांनी अनेक युगल आणि भावगीतांची मैफल सादर केली. कलाकारांची काही सादरीकरणे अशी होती.
अनिल तेलंग व हरजित कौर – ‘बेखुदी में सनम’, ‘कितना प्यारा वादा’
दिलीप जनाई – ‘आपके आ जाने से’, ‘लिखा है तेरी आंखों में’
शिवदत्त खंडेनाथ – ‘करवटें बदलते रहे’, ‘तुम पास आए’
शीला नेगे – ‘क्या यही प्यार है’, ‘बाबुजी धीरे चलना’
दिनेश कामतकर – ‘सोनी मेरी सोनी’, ‘जमाने की बुराई’
इंद्रपाल खापेकर – ‘तुमारा चाहने वाला’, ‘तू प्यार है किसी और का’
सौरभ शिरपुरकर – ‘हंसी बन गए हो’
स्वाती मोहाडीकर – ‘मेरे ढोलना सुन’, ‘तुम पास आए’
वीणा मोहाडीकर – ‘हम तेरे प्यार में सारा आलम’
राज चौधरी व वैशाली मदारे – ‘फूल तुम्हें भेजा है’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन वीणा मोहाडीकर यांनी केले. स्ट्रीमिंग प्रफुल नांदे यांनी सांभाळली तर ध्वनी प्रक्षेपण पिंटू भाई यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना राज चौधरी यांची होती. Nagpur News संगीतप्रेमी, रसिक श्रोते आणि संगीत समीक्षकांनी कलाकारांचे मनःपूर्वक कौतुक केले आणि कार्यक्रमाला प्रचंड दाद दिली.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र