nagpur-women-safe-in-city पाेलिसांची सतर्कता आणि निर्भया, दुर्गा मार्शल, दामिनी पथकाची 24 बाय 7 गस्तीमुळे शहरातील शाळकरी मुली, तरुणी आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिसांच्या रस्त्यावरील चाेवीस तास ‘व्हिजीबिलिटी’असल्यामुळे राेडराेमियाे आणि टवाळखाेरांवरही वचक निर्माण करण्यात आला आहे. गेल्या 10 महिन्यांत विनयभंगाच्या कक्षेत माेडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.
उपराजधानीत गुन्हेगारीचा ग्राफ कमी हाेण्याऐवजी वाढत जाताे, ही स्थिती लक्षात घेता पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या सकारात्मक धाेरणामुळे गुन्हेगारांवर माेठा वचक बसला आहे. पाेलिस आयुक्तांनी ऑपरेशन थंडर ते ऑपरेशन वाॅशआऊटपर्यंत राबवून गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवले. तसेच शहरातीर शाळकरी विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक, महिला चार्ली, दुर्गा मार्शल, निर्भया पथकासह सामाजिक सुरक्षा विभाग आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या सक्रिय सहभागामुळे महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. nagpur-women-safe-in-city परिणामतः विनयभंगासारखे गुन्हे दाखल हाेण्याचे प्रमाण कमी झाले. परिमंडळ दाेनची गुन्हे नाेंदणीची आकडेवारी लक्षात घेता, 2024 पेक्षा 2025 मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले. परिमंडळात 2024 मध्ये विनयभंगाचे 110 गुन्हे दाखल हाेते. 2025 मध्ये विनयभंगासारख्या महिलाविरुद्ध गुन्ह्यांच्या घटना वाढू नये म्हणून पाेलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी सकारात्मक प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या वर्षी 10 महिन्यांमध्ये 110 विनयभंगाचे गुन्हे परिमंडळात दाखल करण्यात आले हाेते. या आकडेवारीनंतर अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे 2025 मध्ये गेल्या दहा महिन्यांत गुन्ह्यांचा आकडा न वाढू देता उलट 7 गुन्ह्यांनी कमी केला. यावर्षी गेल्या दहा महिन्यांत विनयभंगाचे केवळ 103 गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी कमी झाल्यामुळे तरुणी व महिलांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाेलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते. विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. महिलांना सुरक्षित वातावरण वाटावे म्हणून आम्ही चाेवीस तास सज्ज असताे.