जन्मदात्रीच निघाली हत्यारीन

19 Nov 2025 18:51:51
गोंदिया,
baby theft case नवजात बालक चोरी झाल्याचा बनाव करणारी जन्मदात्रीच बालकाची हत्यारीन निघाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रिया राजेंद्र फाये (२३) रा. डांगोर्ली ता. जि. गोदिया असे आरोपी मातेचे नाव आहे. आज १९ नोव्हेंबर रोजी बालकाचे प्रेत डांगोर्ली नदी पुलाखाली आढळून आले. या घटनेने जनमानसात कुमातेप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
 

बेबी थेफ्ट  
 
 
तालुक्यातील डांगोर्ली येथील राजेंद्र फाये (२६) व रिया हिचा २०२३ मध्ये प्रेम विवाह झाला होता. त्यांच्या संसार वेलीवर २० दिवसांपूर्वी विराज नावचे पुष्प बहरले. १७ नोव्हेंबर रोजी रात्री जेवन करून फाये दाम्पत्य झोपी गेले. दरम्यान रिया हिने विराज याला घरापासून काही अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवरील पुलाखाली फेकून ती घरी परतली. यानंतर रियाने पती राजेंद्रला विराज कुठे आहे असे विचारले. यानंतर विराजचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठे मिळून न आल्याने रावणवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली. तक्ररीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मागदर्शनात रावणवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला गती दिली.baby theft case तपासात रियाला मूल पाहिजे नसल्याची बाब समोर येताच पोलिसानी रियाची कसून विचारपूस केली. यानंतर तीने विराजला वैनगंगा नदी पुलाखाली फेकून दिल्याचे सांगून गुन्हा कबूल केला. रावणवाडी पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये रियाविरूद्ध गुन्हा नोंद करून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक वैभव पवार, पोलिस उपनिरिक्षक मानवकर, पोलिस हवलदार गिरिश पांडे, रंजीत बघेले, शुशील मालेवार, आशिष वैध यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

रिया हिने राजेंद्रसोबत प्रेमविवाह केला होता. तिची नोकरी करण्याची मनषा होती. या ईच्छेमुळे तिने पूर्वी गर्भपात केला होता. यानंतर तीला गर्भ राहिला. यावेळीही तिने गर्भपात करण्याचा विचार केला होता. मात्र पती राजेंद्र याने स्पष्ट नकार दिला. रिया हिने २९ आक्टोबर रोजी येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र तिला मुले हवं नसल्याने अवघ्या २० दिवसाच्या बालकाला नदी पुलाखाली फेकून देत बालक चोरी झाल्याचा बनाव केला. पोलिसानी अवघ्या काही तासांतच कुमातेला बेड्या ठोकल्या
Powered By Sangraha 9.0