सीतासावंगी येथील कॅनरा बँकेतून दिड कोटीची रक्कम लुटली

19 Nov 2025 13:04:20
गर्रा/बघेडा,
canara bank तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याअंतर्गत येणा्èया सीतासावंगी येथील कॅनरा बँकेच्या शाखेत अज्ञातांनी कुलूप तोडून प्रवेश करीत दिड कोटीही अधिक रोकड व अन्य साहित्य लंपास केले आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. सकाळी बँकेचे कामकाज सुरु करण्यासाठी गेले असता हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.
 
 

कॅनरा बँक  
 
 
कॅनरा बँकेच्या शाखेत महाव्यवस्थापक गणेश भाऊजी सातपुते (३३) यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीतासावंगी येथील कॅनरा बँकेच्या शाखेतील चिखला येथून १७ ते १८ नोव्हेंबर च्या रात्री दरम्यान सामानासह १ कोटी ५८ लाख ४७ हजार ९४४ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. बँकेच्या दाराचे कुलूप तोडून २७ हजार रुपये किमतीचे ९ सीसीटीव्ही कॅमेरे, स्टड्ढाँग रुम मधून १ कोटी ५८ लक्ष १२ हजार ९४४ रुपये रोख रक्कम चोरून नेली. सकाळी बँकेचे कामकाज सुरु करण्यासाठी कर्मचारी गेले असता चोरीची घटना उघड झाली.canara bank शाखा प्रबंधक सातपुते यांच्या तक्रारीवरुन गोबरवाही पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५ (ई) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0