सहकार भारतीचा सहकार सप्ताहानिमित्त संवाद

19 Nov 2025 15:14:49
हिंगणघाट,
sahakar bhartis dialogue सहकार भारती हिंगणघाटच्या वतीने शहरातील व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सहकार सप्ताह निमित्ताने चर्चात्मक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्धा येथील सुनिल पाटनकर यांनी पतसंस्थाच्या वसुली कामात १०१(१) चे दाखल्याची उपयुक्तता यासह कलम ९१,१३८,सीपीसी ६० आदींबाबत मार्गदर्शन करुन चर्चात्मक संवाद साधला.
 
 
सहकार भरती
 
 
यावेळी आदर्श महिला नागरी सह पत संस्था संस्थापक आंचल थुल, हिंगणघाट तालुका सहकार भारतीचे अध्यक्ष रामदास खेकारे, महामंत्री नंदकुमार सिंगरु, वर्धा जिल्हा सहकार भारतीचे महामंत्री श्यामकुमार खत्री आदीची मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक श्यामकुमार खत्री यांनी केले.sahakar bhartis dialogue सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोळसे यांनी सहकार भारतीचे सदस्यत्व बाबत माहिती दिली. शहरातील पतसंस्था पदाधिकारी, कर्मचारी आदींनी जास्तीत जास्त संख्येने सभासद करण्यात यावे असे सांगितले. संचालन नंदकुमार सिंगरु यांनी तर आभार शंकर चंदनखेडे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0