साई सावलीचा दिवाळी आपुलकी उपक्रम

19 Nov 2025 14:38:35
नागपूर,
Sai Savli Old Age Home सत्यसाई बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित ‘साई सावली वृद्धाश्रम’ अंतर्गत ‘गंध आपुलकीचा’ हा ऋणानुबंधाचा अनोखा उपक्रम दरवर्षी दिवाळीच्या निमित्त आयोजित केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथील पुसेर व आसपासच्या दुर्गम आदिवासी वस्तीतील माडीया गोंड जमातीतील ४०० लोकसंख्येपर्यंत पोहोचला. कार्यक्रमात प्रत्येक कुटूंबाला साडी, शर्ट-पॅन्ट, ब्लँकेट आणि फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमात अनेक दानधर्म करणाऱ्यांनी रोख आणि वस्तू स्वरूपात मदत केली, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
 

nagpur
 
डॉ. विनोद केळझरकर (अध्यक्ष), विशाखा मोहोड (नगरसेविका), तसेच रविंद्र गीते, उदयजी लाड, जगदीश कावळे, नरेशजी बैस, प्रकाशजी मोहोड, अभिजित मस्के, तिर्थराज बोबडे आणि अभिजित काठाले या सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे यश सुनिश्चित केले. Sai Savli Old Age Home सदस्यांनी यावेळी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी वाढते आणि आदिवासी लोकांमध्ये आपुलकीचा संदेश पोहोचतो.”
सौजन्य: स्मिता बोकारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0