रांगोळीत शिवाजी महाराज; किल्ल्यात रायगड प्रथम

19 Nov 2025 19:41:43
वर्धा, 
shivaji-maharaj-in-rangoli : स्व. सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व संस्कार भारती यांच्या संयुत वतीने रविवार १६ रोजी सायंकाळी वाचनालयात दीपोत्सव २०२५ हा विविधरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी किल्ले व रांगोळी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना गिरीश अग्निहोत्री यांच्यातर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहन असे ४५ हजाराची बक्षिसे प्रदान करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम अक्षय सोमनकर यांच्या शिवाजी महाराजांच्या रांगोळीचा तर किल्ले स्पर्धेमध्ये कृष्णनगर येथील किल्ले रायगडचा आला.
 

jkl 
 
 
 
रांगोळी स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक अनुश्री खंगार तर तिसरा क्रमांक प्रज्वल देवडे यांनी पटकावला. किल्ला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक भावेश पंचभाई यांनी बनवलेल्या भगतसिंग चौकातील पारगड किल्ल्याचा तर तृतीय क्रमांक खुशी झाडे हिने कृष्णनगर येथीलच बनवलेल्या जिंजी किल्ल्याचा आला. रांगोळी व किल्ले परीक्षण सागर पेरके, विजय पाटणकर, संजय तिळले, चंद्रकांत सहारे व करिष्मा कुलधारिया यांनी केले.
 
 
दुसर्‍या सत्रामध्ये कराओके वर जुन्या नवीन पिढीचा ताळमेळ साधत गाणी प्रस्तुत करण्यात आली. हृदया धांदे हिने मेरे घर राम आयेंगे या गीतावर सुंदर नृत्य प्रस्तुती दिली. कार्यक्रमाला संस्कार भारती गोवा प्रांतचे अध्यक्ष भूषण भावे, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वासुदेव लेकुरवाळे, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश अग्निहोत्री, संजीवनी वंजारी, सागर पेरके उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सतीश बावसे, मंगेश परसोडकर, अनिल पाखोडे, केतकी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0