जि.प. शाळांतील शौचालये कागदावरच ‘ओके’

19 Nov 2025 15:27:28
वर्धा,
zp schools अनेकांकडून कॉन्व्हेंटचा आग्रह धरल्या जात असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावत आहे. कॉन्व्हेंटसोबतच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा लढा देत असल्या तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांत मुलांसाठी तर १५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालयच नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या ९०५ पैकी ९०४ शाळांत शौचालय असल्याची नोंद जिल्हा प्रशासनातील शिक्षण विभागाने घेतली आहे. परिणामी, जि.प. शाळांतील शौचालये कागदावरच ‘ओके’ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

शैचालाय  
 
 
जिल्ह्यात जिपच्या ९०५ शाळा आहेत. त्यापैकी ९०४ शाळांमध्ये शौचालये असल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. परंतु, २८ शाळांमध्ये मुलांसाठी आणि १५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याचीही नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. स्वतंत्र शौचालयाअभावी विद्यार्थ्यांना शाळेत शिकताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मुलींच्या स्वच्छतेच्या बाबतीत हा मुद्दा आणखीनच गंभीर होतो. जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार, वर्धा जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये शौचालये असली तरी काही ठिकाणी शौचालयाची अवस्था अत्यंत दयनिय आहे. शालेय इमारतींमध्ये असलेल्या शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसतो. काही शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाहीत.zp schools सेलू तालुयातील तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालयाची सुविधाच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही शिक्षण विभागाने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
विद्यार्थिनींची कुचंबना
जिल्हा परिषदेच्या १५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याने संबंधित शाळेत विविध विषयाचे धडे घेणार्‍या विद्यार्थिनींना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उघड्यावर जाण्याचा प्रकार अनुचित घटनेला निमंत्रण देणाराच आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय असणे गरजेचे असून त्या दृष्टीने प्रशासनानेही ठोस पावले उचलण्याची गरज व्यत केली जात आहे
Powered By Sangraha 9.0