वाहुल दोंदल यांनी शिलाबम (लाठी-काठी) खेळत पटकावला राज्यस्तर प्रथम क्रमांक

19 Nov 2025 14:52:54
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Vahul Dondal : येथील उज्ज्वलनगरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांचा विश्वभारती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तिसèया वर्गात शिक्षण घेत असलेला मुलगा वाहुल (शुभ्रूराजे) याने 16 व 17 नोव्हेंबर 2025 ला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे घेण्यात आलेल्या सिलंबम स्पोर्टस् असोशिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अ‍ॅमेच्युअर सिलंबम असोसिएशनद्वारा आयोजित शिवराय चषक चॅम्पियनशिप महाराष्ट्र स्टेट राज्यस्तर सिलंबम (लाठी-काठी) या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले.
 
 
 
vahul
 
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तर शिवराय चषक सिलंबम (लाठी-काठी) चॅम्पियनशिप स्पर्धेत वाहुल (शुभ्रूराजे) याने सहभाग घेतला. या खेळामध्ये वाहुल (शुभ्रूराजे) याने 9 वर्ष आतील 20 किलो वजन आतील गटात सिलंबम (लाठी-काठी) खेळ प्रकारा मध्ये प्रथम येऊन सुवर्णपदक आणि स्टिक रोलिंग फाईट (लाठी युद्ध कला) या खेळ प्रकारात दुसèया क्रमांकाचे सिल्वरपदक आपल्या नावी करून घेतले वाहुल ने दोन-दोन सुवर्णपदक व सिल्वरपदक जिंकून महाराष्ट्र तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान खेळाडू दोन सुवर्णपदक व सिल्वरपदक विजेता असल्याचा मान मिळवला, वाहुल (शुभ्रूराजे) विनोद दोंदल याच्या विजयाचे सम्पूर्ण शयाचे खरे शिल्पकार त्याचे वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल, बहीण काश्यपी दोंदल, विशेष आभार विजयाचे शिल्पकार प्रशिक्षक प्रीतम सर सोनवणे यांचे आहे, त्याच बरोबर भाऊ संस्कार दोंदल, शौर्य दोंदल, शिक्षण घेत असलेल्या विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका दीप्ती मॅम देशमुख, शाळेचे सचिव, भारमल मॅडम, वर्गशिक्षिका वैष्णवी शिंदे,प्रिया पाटील मॅम, क्रीडा शिक्षक अमोल जयसिंगपूर, आकाश खंदार सर, सोनू गावंडे मॅडम, हजारे सर सर्व शिक्षक वृंद इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शन करीन सहकार्य करीत राहतात, वाहुल सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व सवंगडी मुले-मुली सहकार्य करत असतात, वाहुल याच्या यशाबद्दल वाहुल (शुभ्रूराजे), विनोद दोंदल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0