पुरुष नसबंदीत वर्धा जिल्हा अव्वल

19 Nov 2025 15:32:42
वर्धा,
male sterilization लोकसंख्या नियंत्रणासाठी नसबंदी शस्त्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. पण, या शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये अनेक गैरसमज आहेत. पुरुष नसबंदी कशी फायद्याची हे पटवून देण्यात आल्याने गतवर्षी तब्बल ७२ पुरुषांनी स्वत: पुढाकार घेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया केली.
 
 

फॅमिली प्लांनिंग  
 
 
पुरुष नसबंदी ही गर्भधारणा टाळण्यासाठी एक कायमस्वरूपी आणि सोपी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये शुक्राणू वाहून नेणार्‍या नळ्या बंद केल्या जातात. यामुळे शुक्राणू वीर्यातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा टाळता येते. ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते. शिवाय खूप कमी जोखमीची आहे. अनेकदा ही शस्त्रक्रिया एका तासात पूर्ण होते.male sterilization  त्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतो. पुरुष नसबंदी ही गर्भधारणेपासून बचाव करण्याची एक प्रभावी आणि कायमस्वरूपी पद्धत आहे. शिवाय स्त्री नसबंदीपेक्षा सोपी आणि सुरक्षित पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मानली जाते. ही एक किरकोळ शस्त्रक्रिया आहे. यात गुंतागुंत होण्याची शयता कमी असते.
Powered By Sangraha 9.0