मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षण करण्यासाठी कठोर कायदा करा

19 Nov 2025 18:16:26
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
anti-land-grabbing-act : मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 18 नोव्हेंबर या दिवशी यवतमाळ येथे महाराष्ट्र मंदिर महासंघासह 15 मंदिरांच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सामाजिक न्याय व विधी विभागाचे मंत्री आशिष देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन पाठवण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी निवेदन स्वीकारले.
 
 
 
y19Nov-Hindu
 
 
 
भूमाफियांकडून मंदिराच्या जमीनी हडप केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाèयांशी संगनमत करून कोट्यवधी किंमतीच्या जमिनींची कवडीमोल किंमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत. राज्यात हा कायदा तत्काळ लागू करण्यासह विशेष तपास पथके स्थापन करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसाम यांसारख्या राज्यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच फौजदारी स्वरूपाचा ‘अ‍ॅन्टी लॅन्ड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ (जमीन हडपविरोधी कायदा) लागू केला आहे. याच प्रकारे असा दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा.
 
 
विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून महाराष्ट्रातील मागील 20 ते 25 वर्षांतील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची सखोल चौकशी करावी. या कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावी. खटले सहा महिन्यात निकाली काढावेत. जेणेकरून देवस्थानांना त्वरित न्याय मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
निवेदन देताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे, संकटमोचन मंदिराचे अध्यक्ष रामदास नालमवार, रेणुकामाता मंदिराचे महादेव काचोरे, गणपती मंदिर संस्थान राधिका लेआउटचे बाळकृष्ण चावरकर, संतुकराव जोशी, सुरेश कुळकर्णी, प्रकट जयहनुमान मंदिराचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र गटलेवार, संत गजानन महाराज मंदिर संस्थान जे एन पार्क लोहाराचे उपाध्यक्ष अनिल याउल, विजय दुर्शेट्टीवार, अष्टविनायक मंदिर मैथिलीनगरच्या अनुपमा कुळकर्णी, मिलिंद कुळकर्णी, दुर्गादेवी मंदिर सुभाषनगरचे सचिव अ‍ॅड. दीपक आखाडे, वनवासी मारुती मंदिराचे सचिव गोपाळ पांडे, सुबोध राय, महारुद्र हनुमान मंदिर आर्णीनाका येथील पुजारी जगदीश अंकुशकर, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक विजय जाधव, प्रफुल टोंगे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, जिल्हा संयोजक तथा साई मंदिरचे भगवान डगवार, जिल्हा संघटक दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0