‘सर्व पक्ष एकला चलो’च्या भूमिकेत

19 Nov 2025 18:14:15
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
arni-municipal-council : येथील नगरपरिषदेत कोणत्याही पक्षाची युती झालेली नाही फक्त शिवसेना उबाठा व मनसे सोडून आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये न्याय मिळाल्याची भावना दिसून येत आहे.
 
 

election 
 
 
 
काही पक्षात बंडखोरी होऊन कार्यकर्त्यांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र भरलेले आहे. आता यांची मनधरणी करुन त्यांचे अर्ज परत घेतल्या जाईल की ते तटस्थ राहिल, हे 21 तारखेला समजणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव सेना, शिंदेसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. उद्धवसेनेकडून तीन जोडपे रिंगणात उतरले आहेत. भाजपाच्या एका पदाधिकाèयाच्या कुटुंबातील सदस्याने अजित पवार गटाकडून नामांकन दाखल केले आहे.
 
 
नगरपरिषदेचे माजी सभापती गणेश हिरोळे यांना शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांचे तिकीट कापण्यात आले. भाजपाचे अनिल इंगोले यांचे नाव नप अध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित मानले जात होते. त्यांना उमेदवारी नाकारून नवीन चेहèयाला संधी देण्यात आली. परंतू या दोघांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
 
 
मागील पंचवार्षिकमधील आठ नगरसेवक याहीवेळी विविध पक्षांकडून रिंगणात उतरले आहेत. नामांकन दाखल करणाèयांपैकी कोण अर्ज मागे घेतो, कुठे बंडखोरी होते, हे नामांकन परत घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार ख्वॉजा बेग यांच्या नेतृत्वात सर्वाधिक 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अल्पशा मताने पराभव झाला होता.
नप अध्यक्षपदासाठी कांग्रेसकडून नालंदा भरणे, आम-आदमी पार्टीकडून संजय वाघमारे यांनी तर भारतीय जनता पार्टीकडून राजू वाडेकर, राष्ट्रवादी कांग्रेस अपकडून अश्वजित गायकवाड, शिवसेना शिंदेकडून नप अध्यक्षपदासाठी कुणाल मनवर, शिवसेना उबाठाकडून माजी सभापती लक्ष्मण पठाडे यांनी नामांकनपत्र दाखल केले आहे. नप अध्यक्षासाठी 21 तर नगरसेवकासाठी 165 नामांकन पत्र आले होते.
Powered By Sangraha 9.0