यवतमाळ नगर परिषद निवडणुकीचा ‘धुरळा’

19 Nov 2025 14:48:16
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Yavatmal Municipal Council Elections : यवतमाळ नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांनी शेवटच्या दिवशी नामांकनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवकांनी कंबर कसली आहे. आघाडी-युती फिस्कटल्याने शहरातील बहुतांश ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी तिहेरी लढत होण्याचे चित्र दिसून येत आहे.
 
 
 
y18Nov-Gardi
 
 
 
जिल्ह्यातील दहा पालिका व एका नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी सोमवार, 17 नामानिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी आघाडी-युतीची बोलणी फिस्कटली. यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी स्पर्धेत असलेल्या उमेदवारांना डावलण्यात आल्याने ऐनवेळी त्यांनी दुसèया पक्षाची उमेदवारी घेत नामांकन दाखल केले.
 
 
शेवटच्या क्षणापर्यंत कोणकोणत्या पक्षाचा उमेदवार आहे, याचीच चर्चा सुरू होती. यवतमाळ नगर परिषदेत ऐनवेळी महाविकास आघाडीत बिघाडी झाली. काँग्रेस-शिवसेना ठाकरे पक्षात ऐनवेळी फूट पडली. काँग्रेसकडून नप अध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवारीच्या यादीत तेजस्विनी चांदेकर यांचे नाव होते. त्यांना शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसकडून एबी फॉर्मवर दोन नावे देण्यात आली आहेत. यात पहिल्या क्रमांकावर माधुरी मडावी यांचे नाव होते. मात्र, त्यांचे नाव बाद झाल्याने दुसèया क्रमांकावर असलेल्या प्रियंका मोघे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे यवतमाळ नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलल्या जात आहे.
 
 
यवतमाळ पालिकेत शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 21, तर शिवसेना नगर परिषद अध्यक्षांसह 35 जागांवर लढणार असून, नगर परिषद अध्यक्षसाठी भाजपा अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, शिवसेना ठाकरे वैशाली कोवे, शिवसेना (शिंदे) तेजस्विनी चांदेकर, काँग्रेस प्रियंका मोघे हे मैदानात आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणूकीत मतदार राजा कोणाच्या पदरात मताचे दान करणार हे येणार काळ सांगेल.
बंडखोर कोणाचे गणित बिघडविणार ?
 
 
पक्षाचे एकनिष्ठेने काम करुनसुद्धा पक्षाने उमेदवारी नाकारल्याने यवतमाळ नगर परिषदेतील काही ठिकाणी बंडखोराने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या बंडखोरांमुळे कोणाचे गणित बिघडणार आहे, हे येणारी वेळच सांगेल.
माधुरी मडावी यांचे नामांकन बाद
 
 
यवतमाळ नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी आपले नामांकन दाखल केले होते. मात्र, काही तांत्रीक अडचणीमुळे त्यांचे नामांकन बाद झाले आहे. माधुरी मडावी यांच्या नामांकन दाखल केल्यामुळे या निवडणूकीत चांगलीच रंगत आली होती. तर नागरिकांमध्ये माधुरी मडावी यांच्या नामांकनाकडे लक्ष लागून होते.
Powered By Sangraha 9.0