नवी दिल्ली,
baba-ramdevs-reply-to-kharge काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (रा. स्व. संघ) बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की ज्यांचे विचार भारत आणि भारतीयतेशी सुसंगत नाहीत, तेच असे एजेंडे राबवतात. त्यांना जर लढायचे असेल तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी लढा द्यावा, पण ते त्यांना हरवू शकत नाहीत, म्हणून रा. स्व. संघावर अशिष्ट टीका करतात.

दिल्लीतील ANI सोबतच्या विशेष मुलाखतीत बाबा रामदेव म्हणाले, "आरएसएस ही कोणती राजकीय पार्टी नाही. तिचे राजकीय अंग म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. लढायचे असेल तर अमित शाह आणि मोदी यांच्याशी लढा. पण ते त्यांना हरवू शकत नाहीत, म्हणून वारंवार रा. स्व. संघावर घाणेरड्या टिप्पणी करतात. रा. स्व. संघाला मी गेली दोन-तीन दशके जवळून पाहिले आहे. त्या संस्थेत अत्यंत समर्पित आणि तपस्वी लोक आहेत." ते पुढे म्हणाले, "ज्यांचे विचार भारत आणि भारतीयतेशी जुळत नाहीत, तेच असे विघातक एजेंडे राबवतात. baba-ramdevs-reply-to-kharge रा. स्व. संघ हे आर्य समाजासारखेच राष्ट्रवादी संघटन आहे. डॉ. हेडगेवार, सदाशिवराव गोलवलकर यांसारख्या अनेक महान व्यक्तींनी या संघटनेत कठोर तपस्या केली आहे. आजही लाखो संघ स्वयंसेवक देशसेवेत गुंतलेले आहेत. जेव्हा देशविरोधी किंवा सनातनविरोधी शक्ती आरएसएस वा हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध करतात, तेव्हा त्यामागे त्यांचा काही तरी स्वार्थी हेतू आणि गुप्त अजेंडा असतो."

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी म्हटले होते की, देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी रा. स्व. संघ जबाबदार आहे, म्हणून या संघटनेवर पुन्हा एकदा बंदी घालायला हवी. baba-ramdevs-reply-to-kharge त्यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही स्पष्ट केले होते.