देवळी,
Scouts and Guides भारत स्काऊट गाईड या शैक्षणिक चळवळीला ७ नोव्हेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने राष्ट्रीय कार्यालयातर्फे दिल्ली येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर गडपुरी परिसरात ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ’डायमंड जुबली सेलिब्रेशन’ शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात भारतातून ३५० स्काऊटस, गाईड्स, रोव्हर्स आणि रेंजर्स सहभागी होणार आहेत.
या शिबिराकरिता महाराष्ट्र राज्यातर्फे वर्धा भारत स्काऊटस आणि गाईड्सतर्फे स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील १२ रोव्हर्स आणि रेंजर्स यांची निवड झालेली असून ते महाराष्ट्र राज्याचे रोव्हर विभागाचे प्रशिक्षक तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुत कॅप्टन यात सहाय्यक रेंजर लीडर कल्याणी लिखार, वैष्णवी शिरभाते, रेंजर आरती मरघडे, कांचन देशमुख, तनीषा उईके, साक्षी सातव, यामिनी पारधी, विक्की पेंदोरकर, कुंदन कावडे, राम देशमुख, निशांत शितळे व विपुल पेंदाम यांचा समावेश आहे.
शिबिरात आपआपल्या राज्याच्या परंपरेवर आधारित नृत्य, वेशभूषा, भाषांचे देवाण-घेवाण, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्तीपर गीत, वक्तृत्व व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेयप्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, जिल्हा संघटक नितेश झाडे, गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांना दिले.