नेत्रहीन दिव्यांगानी घेतली महावितरण अधीक्षक अभियंताची भेट

02 Nov 2025 16:44:50
वाशीम,
Blind स्थानिक एकबुर्जी धरणालगत असलेल्या चेतन सेवांकुर येथील नेत्रहीन मुलांनी विज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अजय शिंदे यांची भेट घेतली.
 

Blind, disabled children, Chetan Sevankur, Ajay Shinde, Mahavitaran, electricity disruption, power supply issue, Washim, One Burji Dam, Visually impaired, community concern, Diwali celebration, Chetan Sevankur officials, power cut resolution, Rajesh Chavan, social awareness, government intervention, electrical supply restoration, local support, festival in darkness. 
 
शहराला पाणी पुरवठा करणार्‍या एकबुर्जी धरण परिसरात मागील पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने या परिसरासह जन्मतः अंध असलेल्या नेत्रहीन मुलांचे निवासस्थान चेतन सेवांकुर याठिकाणी सर्वत्र अंधकार पसरला होता. जीवनात नियतीने अंधकार घातलेला असताना परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या मुलांनी विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना खंडित विद्युत पुरवठा बाबतच्या अडचणी मांडल्या. दिवाळी सारखा सण अंधारात गेल्यामुळे अधीक्षक अभियंता शिंदे यांनी लवकरात लवकर ही समस्या दूर करण्यासाठी अधिकारी राजेश चव्हाण यांना निर्देश दिले. यावेळी चेतन सेवांकुरचे संचालक पांडुरंग उचितकर यांच्या सह विलास कोल्हे, पांडुरंग सरनाईक, चेतन उचितकर, दशरथ जोगदंड, अमोल गोडघासे,विजय खडसे, गजानन दाभाडे, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0