रावसाहेब दानवे यांचा नातू आणि आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

02 Nov 2025 15:34:47
नाशिक,
Shivam Patil माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील आणि इतर आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात, नाशिकमधील सातपूर येथील उद्योजक कैलास अहिरे यांनी तक्रार केली असून, त्यांचा आरोप आहे की, त्यांना 10 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 
 

Shivam Patil 
प्रकरणाच्या तपशिलानुसार, कैलास अहिरे हे भाजपचे नाशिकमधील उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांची एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. कंपनी सातपूर एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. कैलास अहिरे यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी एका कार्यक्रमात भेट घेतली होती, जिथे त्यांनी कंपनीवर असलेल्या कर्जाच्या बाबतीत मदतीची विनंती केली होती. अहिरे यांचे म्हणणे होते की, कंपनीला मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, आणि त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.दानवे यांनी त्यांना आश्वासन दिले की, ते त्यांना मदत करणार आहेत. या संदर्भात, रावसाहेब दानवे नाशिकला आले आणि त्यांनी कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. भेटीच्या वेळी, दानवे यांनी कंपनीला 14 टक्के शेअर्स देण्याची अट ठेवली आणि शेअर विना 25 कोटी रुपयांचा व्यवहार ठरवला. त्यानुसार, कंपनीच्या 14 टक्के शेअर्ससाठी 25 कोटी रुपये देण्याचा करार झाला.
 
 
परंतु, व्यवहारानंतर Shivam Patil  दानवे यांनी सुरुवातीला 14 कोटी 34 लाख 98 हजार रुपये अहिरे यांना दिले, पण उर्वरित 10 कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. यावर कैलास अहिरे यांनी बारंबार संपर्क साधला, पण फसवणुकीची रक्कम त्यांना मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. तसंच, शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं.या प्रकरणात, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील, गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद आणि मंदार टाकळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सर्वावर आरोप आहे की, त्यांनी कंपनीतील शेअर्स हस्तांतरित करून आणि डमी खात्यांमधून पैसे हस्तांतरित करून फिर्यादीची दिशाभूल केली.कैलास अहिरे यांच्या तक्रारीनुसार, या सर्व आरोपींनी कंपनीतील शेअर्ससाठी 25 कोटी रुपयांचा करार केला होता, पण त्या पैशांच्या तुलनेत फसवणूक करून उर्वरित 10 कोटी रुपये देण्याचे टाळले. फसवणूक आणि आर्थिक व्यवहारातील अपप्रवृत्तीसाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे उद्योग वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या तपासावर उद्योग आणि राजकारण क्षेत्रातील लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0