नागपूर,
Halloween celebration हॅलोविनची ही परंपरा प्राचीन केल्टिक संस्कृतीतून आलेली आहे. त्या काळी लोकांचा समज होता की या दिवशी भूत आणि राक्षस जगात येतात. त्यामुळे त्यांना घाबरवण्यासाठी लोक स्वतःच भूत बनत असतभूत आहे का नाही, हा प्रश्न कायम चर्चेत असतो पण नागपूरकरांनी यावेळी ‘भय’लाच खेळात बदललं ! राष्ट्रभाषा भवन, सीताबर्डीच्या प्रांगणात एनिमश इव्हेंट्स तर्फे आयोजित हॅलोविन उत्सवात मुलांनी आणि तरुणांनी भुतांचे, राक्षसांचे, जादूगारिणींचे वेगवेगळे वेश परिधान करून धमाल केली.

रात्रीचा गडद अंधार, पार्श्वभूमीला थरारक संगीत आणि झगमगणारे दिवे, वातावरणच ‘भयमुक्त’ पण ‘भयमय’ झालं होतं! लहानग्यांनी “ट्रिक ऑर ट्रीट!” म्हणत मिठाईची मागणी करत घराघरात धम्माल केली. Halloween celebration या कार्यक्रमात अनेक मुलांनी आपली भीती दूर करत आत्मविश्वासाने सादरीकरण केलं. कुणी व्हॅम्पायर तर कुणी झॉम्बी बनून उपस्थितांना घाबरवलं, तर कुणी ‘भय’कडे हसत पाहायला शिकवलं.कार्यक्रमाच्या शेवटी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं“भूत हे प्रत्यक्षात नसतं, ते माणसाच्या कल्पनेत असतं!”समितीने भूत दाखविणाऱ्यास किंवा त्याचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहितीही दिली.
सौजन्य:श्रीराम दुरूगकर,संपर्क मित्र