नागपूर,
Jagruteshwar Temple आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! जागृतेश्वर मंदिर, जागनाथ बुधवारी, नागपूर हे भोसलेकालीन प्राचीन आणि प्रसिद्ध विठ्ठल-रखुमाई मंदिर नुकतेच पुरातत्व विभागाकडून हेरिटेज मंदिर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी मध्य नागपूर विकास आघाडी आणि मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला होता, तर आमदार प्रवीण दटके यांनी सहकार्य केले. Jagruteshwar Temple आता मंदिराच्या जीर्णोद्धार आणि सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी भूषण दडवे, सुनील धोटकर, आणि आकाश राऊत या भक्तांनी केली आहे.
सौजन्य: राजेश हार्डे, संपर्क मित्र