मंगरुळनाथ येथे विराट हिंदू धर्म सभा

02 Nov 2025 18:40:14
मंगरूळनाथ,
mangrulnath, Hindu congregation आम्हाला धोका गैरधर्मीयांपासून नसून आपल्याच घातकी हिंदू पासून आहे. अशा अविचारी हिंदू पासून आपल्याला सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. या सभेत फक्त आणि फक्त सनातनी हिंदू उपस्थित झाले असून हिंदू विरोधी हिंदू दुरून सभा ऐकत आहेत व काही झोपून आहेत अशांना घरीच झोपून राहू द्यावे. कारण हेच देश विघातकांना साथ करत आहेत. सनातनी विचारधारेतील लोकांना पूर्णपणे सावध राहण्याची आज आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी जर नसते तर आज देशाची अवस्था कुठल्या कुठे गेली असती. गैरहिंदु धर्मियांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सनातनी हिंदूंची संख्या मात्र, दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे या देशात हम दो हमारे दो हा कायदा आणणे गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील आ. राजाभैया ठाकूर यांनी मंगरुळनाथ येथील १ नोव्हेंबर रोजी आयोजित विराट हिंदू धर्म सभेत केले.
 

mangrulnath, Hindu congregation  
येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा मैदानात विराट हिंदू धर्म सभेचे आयोजन संत महतांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी भाग्यनगर गोषामहलचे आमदार राजाभैया ठाकूर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर गोस्वामी संत तुलसीदास महाराजांचे वंशज नागा संन्याशी सुदर्शन गिरी, शिव व्यंकटेश आनंद भारती स्वामी महाराज हरिद्वार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
 
 
कार्यक्रम आयोजक प्राध्यापक mangrulnath, Hindu congregation हरिदास ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश उपस्थित समोर सांगितला. विराट हिंदू धर्मसभेला प्रबोधन करण्यासाठी भाग्यनगर गोषामहलचे आ. राजाभैया ठाकूर यांना वाशीम जिल्ह्यामध्ये येण्यास प्रतिबंध करणार्‍या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा पूर्णतः विचार करून नागपूर उच्च न्यायालयाने विराट हिंदू धर्म सभेसाठी व राजाभैय्या ठाकूर यांच्या प्रवेशासाठी सशर्त परवानगी दिली असून आज पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या साक्षीने सत्याचा विजय झाला. नाथ नगरीत हा कार्यक्रम होऊ नये यासाठी काही हिंदू विरोधी विचारवाद्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु भारतीय संविधानाच्या अधीन राहून नागपूर उच्च न्यायालयाने राजाभैय्या ठाकूर यांना परवानगी दिली. सेक्युलर विचारवादी लोकांनी हिंदू धर्माबद्दल गैरसमज पसरविण्याचा उच्छाद घातला आहे. यालाही लगाम लावणे गरजेचे झाले आहे. देशाच्या अस्मितेला जितका धोका बाहेरील लोकांपासून नाही, त्यापेक्षा जास्त धोका आपल्याच गद्दार जयचंदापासून आहे. आपल्या धरतीचे जिहाद, हिंदू मुलींचे लव जिहाद होताना दिसत आहेत. ग़ैरहिंदुना सुद्धा भडकविण्याचे काम हिंदू विरोधी हिंदूच करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहा या महान देशभक्तामुळे आपला देश सुरक्षित आहे. देशात अराजकता माजवणारे हिंदू विरोधी हिंदूं पासून सावध राहण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन शिव व्यंकटेशानंद भारती महाराज हरिद्वार यांनी केले. सुदर्शन गिरी महाराज यांनी धर्माचे महत्व विशद करताना रामायण महाभारताचे दाखले दिले. पावसाचे वातावरण असूनही सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0