बुलढाणा,
Motala taluka heavy rainfall, मोताळा तालुयातील अनेक गावातील परिसरात दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. परिसरात सकाळी अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकर्याची एकच तारांबळ उडाली होती.
तालुयातील गोतमारा, हणवतखेड, कुन्हा, कोन्हाळा, खेडी, पान्हेरा, किन्होळा, पोखरी, तपोवन, कालेगाव, सारोळा पीर, सारोळा मारोती, फर्दापूर, वडगाव, थड, खांडवा, ब्राम्हदा, धामणगाव बढे, रिधोरा, वाडी, पोफळी, गुगली, कोल्ही गोलर, लपाली, सीदखेड, महाजुंगी, पडगाय महा, पि.देवी, लिहा, पोल्ही गवळी, आव्हा, निपाना, मालेगाव, चिंचखेड, दहीगाव, उन्हा यासह बुलढाणा तालुयातील म्हसल बु. परिसरात रात्री १२ ते ३ या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मागील महिन्यात ही शेतकर्यांचे अतिवृष्टीने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. हाता तोंडाशी आलेला घास काही मिनिटांच्या पावसाने पाण्याखाली गेला आहे. मका, कापूस, सोयाबीन, केळी आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही शेतकर्यांनी हरभरा व गहू पिकाची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील हरभरा पिकाला उबळ लागली आहे. त्यामुळे खरीप तर गेलाच पण ख्बीचे पिक ही हातातून जाण्याची शेतकर्यांना मिती आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून या संकटग्रस्त शेतकर्यांना योग्य मदत आणि दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व शेतकर्यांकडून केली जात आहे. उदयनगर येथून जवळच असलेल्या करवंड परिसरात गुरुवारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्याने शेतकर्यांचे नुकतेच सोंगणी करून झाकून ठेवलेल्या सोयाबीनसह तूर, नुकताच पेरलेल्या हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. करवंड परिसरातील शेत शिवारात तब्बल तास दीड तास धुवांधार पाऊस कोसळला, अनेक शेतकर्यांनी सोयाबीन सोंगुन शेतात सोयाबीन सुड्या आहे. मात्र, ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन सुडीत पाणी शिरले. तर तूर पिकासोबतच शेतातील हरभरा पिकांचे सुद्धा नकसान झालेले आहे. यावर्षी अगोदरपासूनच पाऊस शेतकर्याची काही पाठ सोडण्यास तयार नाही.