दसरा दिवाळीत नव्या कोर्‍या १३०० चार चाकी, दुचाकींची भर

02 Nov 2025 19:14:24
वर्धा,
Wardha दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी केली जातात. यंदा दसर्‍याला ९५ तर दिवाळीच्या मुहूर्तावर १ हजार २५१ नवीन वाहनांची नोंदणी झाली. यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला मोठा महसूल मिळाला आहे.
 

Wardha 
शारदीय नवरात्री महोत्सवादरम्यान जिल्ह्यातील अनेकांनी नवीन वाहन खरेदी करण्याची मानसिकता बनवत विविध कंपनींच्या शोरूममध्ये जात कुठले वाहन उत्तम राहिल याची पाहणी केली. त्यापैकी तब्बल ९५ व्यक्तींनी २ ऑटोंबरला दसर्‍याच्या मुहूर्तावर नवीन वाहनाची नोंदणी केली तर १८ ऑटोंबरला धनोत्रोदशी ते २७ ऑटोबर या दिवाळीच्या दिवसात १ हजार २५१ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नोंदणी झालेल्या नवीन वाहनांमध्ये १०६१ दुचाकी, १ मोपेड, ९६ कार, ६९ ट्रॅटर, १ तीन चाकी प्रवासी वाहन, ३ तीन चाकी तर २० मालवाहू वाहनांचा समावेश आहे.
मागील आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात जिल्ह्यात तब्बल २३ हजार ४१२ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. यात १८ हजार ५८३ दुचाकी, २ हजार ३८१ कार, ७९६ ट्रॅटर तर ३१ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. आर्थिक वर्षात वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल ७२ कोटी ७० लाख ३२ हजार ९२८ रुपयांचा महसुलाची कमाई केली आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३१ ऑटोंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या काळात तब्बल १५ हजार ४०५ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यात प्रामुख्याने ३ रुग्णवाहिका, ३६ बसेस, ७९७ ट्रॅटर, १५६६ कार, १२०६४ दुचाकींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0