पुलगावची आर्या जगातील सर्वात वेगवान मॅरेथॉन धावपटू

02 Nov 2025 19:21:20
पुलगाव,
Arya Pankaj Takone येथील ७ वर्षीय आर्या पंकज टाकोने हिने इतिहास रचला आहे. तिने बारामती पुणे येथे आयोजित बीएसएफ मॅरेथॉन स्पर्धेत ५ हजार मिटरचे अंतर अवघ्या २४ मिनिटं २२ सेकंदात पार केले. यानिमित्ताने आर्याने जागतिक विक्रम केला असुन तिचा ब्रिटीश पार्लमेंटमध्ये सत्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.

Arya Pankaj Takone
येथील साधारण Arya Pankaj Takone परिवारातील आर्याचे वडील पंकज टाकोने वर्धा पोलिस येथे कार्यरत असून आई गृहणी आहे. आर्थिक संकटावर मात करीत तिच्या पालाकांनी तिला प्रोत्साहन दिले. तिने इतया कमी वयात मैदानात अतिशय कठोर परिश्रम केले. पुलगाव सारख्या लहान गावात जेथे साधे क्रीडांगण सुद्धा नाही तेथूनच व्हॉलिबॉल मैदातून तिने तिचे प्रशिक्षण सुरू केले. वर्धा, नागपूर येथे प्रशिक्षण घेतले. ज्यावेळी लहान मुलं चालत सुद्धा नाही त्यावेळी देवाने आर्याच्या पायात जणू पवनदेवाचे बळ दिले असावे अवघ्या १२ महिने वय असताना ती वेगवान घावू लागली होती.
Powered By Sangraha 9.0