विदर्भ साहित्य संमेलन उत्साहात

02 Nov 2025 20:04:21
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Vidarbha Sahitya Sammelan विदर्भ साहित्य संघ शाखा, जाम आणि ईश्वर फाउंडेशन, दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 69 वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ येथे उत्साहात पार पडले. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी उबंटू इंग्लिश स्कूल, यवतमाळ येथे झालेल्या या संमेलनात ‘स्मृतीशेष राजानंद गडपायले साहित्य नगरी’ उभारण्यात आली होती. या संमेलनादरम्यान आयोजित ‘सामाजिक समता व बोलीभाषांचे साहित्यिक योगदान’ या विषयावरील परिसंवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. अनेक साहित्यिकांनी या परिसंवादामधून भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
 

Vidarbha Sahitya Sammelan 
परिसंवादाचे अध्यक्ष नागपूरचे ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित होते. यात रावसाहेब काळे (अकोला), काशिनाथ बराटे (अमरावती), श्रीकृष्ण काकडे (अकोला) व अरुण झगडकर (गोंडपिंपरी) यांनी सहभाग घेतला. गजानन कोंडतवार (नवरगाव) यांनी संचालन केले, तर पुरुषोत्तम किचोखले यांनी आभार मानले. मीनल राऊत, रिंकल आडे, नंदकिशोर निमगडे यांनी संयोजनात मोलाची भूमिका बजावली.यावेळी रावसाहेब काळे यांनी आर्थिक विषमता कवितेतून स्पष्ट केली आणि राजकारणातील लोक व नागरिक यांच्यातील फरक अधोरेखित केला. काशिनाथ बराटे यांनी ‘सामाजिक समता आणि बोलीभाषांचे साहित्यिक योगदान’ विषयी बोलताना, बोलीभाषेने विदर्भ साहित्य संमेलनातील आपला ‘प्राकृतिक चेहरा’ टिकवून ठेवल्याचे सांगितले.
 
 
अरुण झगडकर यांनी Vidarbha Sahitya Sammelan भाषेच्या संदर्भात महात्मा फुलेंनी अस्सल मराठी भाषेत साहित्य लिहिले, तसेच दलित-आंबेडकर साहित्य लोकभाषेत असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण काकडे यांनी ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ संविधानाने दिली असून, भारतात असंख्य (जवळपास दोन हजार) भाषा बोलल्या जातात आणि त्या एकमेकांत मिसळल्या आहेत, याकडे लक्ष वेधले.श्रीपाद अपराजित यांनी ‘वाघाला नाचविण्यासाठी भाषा आहे’. ग्रामीण भागातून संत परंपरेपासून संविधानापर्यंत बोली, लोककला आणि लोकसंस्कृती लोप पावत चालली असून, ही लोकसंस्कृती व लोककला ग्रामीण भागातच दिसते, शहरात नाही. इतिहासाची दखल घेणे महत्त्वाचे आहे आणि परिवर्तनासाठी वर्तन महत्त्वाचे आहे. सहजपणे बोलण्याला त्यांनी भाषेचा स्वाध्याय म्हटले. आत्मसंयम फार महत्त्वाचा असून, तो भाषेचा एक भाग आहे आणि या भाषेला सरकारी व्यवस्थेत उत्तर नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.या परिसंवादात सर्व साहित्यिकांनी बोलीभाषा आणि लोकभाषेचे सामाजिक समता प्रस्थापित करण्यातील अनमोल योगदान प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0