मोहसीन नक्वीवर टीका केल्याबद्दल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला होणार अटक!

20 Nov 2025 12:57:33
इस्लामाबाद,  
criticizing-mohsin-naqvi पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वीवर टीका करणे माजी कर्णधार रशीद लतीफला महागात पडले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सायबर क्राइम एजन्सीने चौकशी सुरू केली आहे आणि आता त्यांना तुरुंगवासाची धमकी देण्यात आली आहे.
 

criticizing-mohsin-naqvi 
 
मोहसिन नक्वी पीसीबी चेअरमन झाल्यानंतरही संघाच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. पाकिस्तानी संघाचा कर्णधार सतत बदलला जात आहे, ज्यावर अनेक माजी खेळाडूंनी तीव्र टीका केली आहे. रशीद लतीफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कर्णधार बदल धोरणावर तीव्र हल्ला चढवला. criticizing-mohsin-naqvi शाहीन शाह आफ्रिदीला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाबाबत त्यानी लिहिले की, "शाहीन शाह आफ्रिदीला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे 'तोडा आणि राज्य करा' चे धोरण आहे, जे राजकारणात वापरले जाते." त्यानी असेही म्हटले की पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो एक चांगला कर्णधारही निर्माण करू शकत नाही. त्याच्या या टिप्पण्या पीसीबी आणि अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना आवडली नाही.
 
रशीद लतीफच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या पीसीबीचे वरिष्ठ कायदेशीर व्यवस्थापक सय्यद अली नक्वीने त्यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने (एनसीसीआयए) ताबडतोब कारवाई केली. एनसीसीआयएचे प्रवक्ते नजीबुल्लाह हसनने सांगितले की, इस्लामाबाद आणि लाहोरमधील दोन वेगवेगळ्या तपासासंदर्भात रशीद लतीफचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. criticizing-mohsin-naqvi चौकशी सुरू आहे आणि दोषी आढळल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. माजी कर्णधार वसीम अक्रमविरुद्धही असाच खटला सुरू आहे. त्याच्यावर बेटिंग अॅपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्धही अर्ज दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट गेल्या काही काळापासून वादात सापडले आहे. माजी खेळाडू कर्णधारपदातील बदलांपासून ते बोर्डाच्या निर्णयांपर्यंतच्या मुद्द्यांवर उघडपणे बोलत आहेत, परंतु आता असे दिसते की बोर्ड अशा टीका सहन करण्याच्या मनस्थितीत नाही.
Powered By Sangraha 9.0