बेसा-पिपळा अपघाताबाबत प्रतिज्ञापत्र द्या

20 Nov 2025 17:30:57
अनिल कांबळे
नागपूर, 
besa-pipla-accident : बेसा-पिपळा मार्गावर झालेल्या अपघातात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा अपघात कसा झाला, याबाबत चाैकशी करून दाेन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिलेत. काही दिवसांपूर्वी बेसा पिपळा मार्गावर असलेल्या लक्ष्मी मार्ट पुढे रंगराव पाटील (रा.अथर्व नगरी) यांचा अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याबाबत आणि या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हायकाेर्टाने दखल घेत प्रतिवादींना माहिती सादर करण्याचे आदेश मागील सुनावणीत दिले हाेते. सुनावणीदरम्यान रस्त्याच्या खडतर भागामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट केले व निकृष्ट बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
 
 
BESA
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1150 मीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू असून, 50 टक्के भाग पूर्ण झाला असल्याचे तसेच पेव्हिंग ब्लाॅकसह 300 मीटर काँक्रीट रस्ता पूर्ण झाला असल्याचे सांगितले आहे. पीडब्ल्यूडीच्या वतीने बांधकामाच्या संथ गतीसाठी अल्पनिधी आणि कंत्राटदारांची खराब आर्थिक स्थितीची कारणे सांगितले. संबंधित मंत्रालय, विभाग या संदर्भात त्वरित कारवाई करतील, अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली. दरम्यान बांधकामाधीन रस्त्यावरील विस्कळीत साहित्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.एनएचआयर्ते अ‍ॅड. अनिष कठाणे, नासुप्रर्ते अ‍ॅड.गिरीश कुंटे, सरकारर्ते अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.
 
अपघातात बळी पडलेल्यांना मदत द्या
 
 
बेसा पिपळा भागातील अपघाताची न्यायालयाने तपशीलवार सविस्तर (लेखाजाेखा) नाेंदी मागवल्या असून, पुढील अपघात राेखण्यासाठी व धाेकादायक बांधकामांमुळे वाहतूक विस्कळीत हाेऊ नये यासाठी सुधारणात्मक उपाययाेजना कराव्यात, असे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे झालेल्या मृत्यूसाठी रंगराव पाटील यांच्या कुटुंबाला याेग्य भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
Powered By Sangraha 9.0