उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाही!

20 Nov 2025 21:31:43
नागपूर,
Chandrashekhar Bawankule उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाल्याच्या बातम्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट पार पडले आहे. बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते अजिबात नाराज नाहीत. ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. नगरविकास विभागाचे खातं आणि केंद्र सरकारसोबत समन्वयाचे विषय यासाठी एनडीएच्या नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आहे. एनडीएच्या परंपरेनुसार नेते विशिष्ट कालावधीनंतर एकमेकांना भेटतात. नाराज असल्याच्या बातम्या कपोलकल्पित आहेत.”
 

Chandrashekhar Bawankule 
भाजपा आणि शिवसेना Chandrashekhar Bawankule  पक्षप्रवेशाच्या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात काही कार्यकर्ते भाजपाकडे गेले आहेत कारण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पक्षप्रवेशामुळे महायुतीत गडबड नाही. एकनाथ शिंदे आणि भाजप दोघांनाही आपला पक्ष वाढवायचा आहे. या संदर्भात नाराजी असल्यास अमित शाहांकडे जाण्याची गरज नाही; ती माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाईल.”ओबीसी आरक्षणावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. 27 टक्के आरक्षण कायम राहावे, अशी आमची भूमिका आहे.”
 
 
 
अंतिम कारवाई होईल
 
 
पुणे येथील Chandrashekhar Bawankule जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाबाबत बावनकुळे म्हणाले की, “स्थानिक पातळीवरील समितीच्या अहवालानंतरच अंतिम कारवाई केली जाईल. अंजली दमानिया आणि अन्य आरोपित अधिकारी यांचं मतही ऐकले जाईल. विकास खारगे समितीचा अहवाल आल्यानंतर व्यवहार रद्द करणे किंवा कारवाई करणे ठरवले जाईल. 42 कोटींच्या नोटीससह कोणालाही सुटणार नाही.”भाडेकरूंना दिलासा देत महसूलमंत्र्यांनी सांगितले की, “रीडेव्हलपमेंटच्या वेळी 600 फुटांपर्यंत भाडेकरूंना घर दिल्यास मुद्रांक शुल्क लागू नाही. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत केलेल्या बांधकामांना तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही. 60 लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे.”पदोन्नतीबाबत बावनकुळे म्हणाले, “महसूल विभागातील बॅकलॉग पदोन्नती पूर्ण केल्या आहेत. 550 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे प्रमोशन झाले आहे, त्यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची गरज नाही.”भविष्यातील निवडणूक आणि पक्षप्रवेशांबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, “2029 मध्ये काँग्रेस सर्वात लहान पक्ष राहणार आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक आहे, त्यांनी आपल्या तक्रारी नेत्यांसमोर मांडू शकतात.”
 
 
नवाब मलिक संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. अजित पवार निर्णय घेतील, आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही.” असेही त्यांनी सांगितले
Powered By Sangraha 9.0