समाजाच्या अस्विकृत मनोवृत्तीचे ’गगनभेद’

20 Nov 2025 22:00:41
नागपूर,

Gaganbhed play Nagpur समाजात काहींना वेगवेगळे आजार असतात. मेंदूला दुखापत झाली तर कायमचा अपंगत्व येते. अशा अपंगत्व आलेल्या लोकांना समाज स्वीकारत त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. समाजाच्या याच अस्वीकृत मनोवृत्तीचा दर्शन घडवणारे नाटक ’गगनभेद’ सादर करण्यात आले.
 


 Gaganbhed play Nagpur  
६४वी राज्य नाट्य Gaganbhed play Nagpur  स्पर्धा वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे सुरू आहे. या स्पर्धेत कस्तुरबा वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी, बोरगाव, मेघे, वर्धा यांनी हे नाटक सादर केले. नाटकाचे लेखक प्रमोद भुसारी तर दिग्दर्शक राजू होते. एका मोठ्या कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीची मुले मेंदूच्या आजाराने अपंग असतात. एका बंगल्यात ते राहतात. तरुण आणि तरुणी काही कारणाने त्या बंगल्यात येतात. त्यांना या मुलांबद्दल कळते आणि या मुलांची मदत व्हावी म्हणून एक समाजोपयोगी संस्था ते काढतात. त्या संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि तत्सम काही समाजातले मंडळी करणार ही संस्था काढण्यामागे या मुलांचा उपयोग करून स्वतःची पोळी शेकणे, मिरवणे आणि सरकारी योजनांचा घेणे, हा असतो. या मुलांच्या कानावर ही बाब जाते. आपल्याला मदत दूर पण आपला उपयोग करून ही माणसे स्वतःचा लाभ करून घेत आहे हे कळल्यावर ही मुले त्यांच्याविरुद्ध बंड पुकारतात. हाच गगनभेद नाटकाचा गाभा आहे.
 
 
नाटकात सर्वच Gaganbhed play Nagpur  कलावंतांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा योग्य प्रयत्न केला. यात कैलास चांभारे, सारंग पाटील, डॉ. प्रियंका डफरे, रामभाऊ देवरणकर, आशिष नगराळे, कपिल बोरकुटे, अमित चिंचपाने, मेघाताई तुपकर, डॉ. अंजली वानखेडे, पद्माकर भांदककर, सूर्यप्रकाश पांडे यांनी भूमिका केल्या.
 
 
नाटकाची निर्मिती आणि इतर व्यवस्था हेमलता मेघे, पद्माकर भांदककर, डॉ. शितल रवीभूषण तांगडे यांनी पाहिली. नाटकाचे पूरक संगीत देवकुमार, कोमल खांडेकर यांनी दिले. नेपथ्य संजय तीळले, चंद्रकांत तीळले, प्रकाशयोजना मनोज बावने यांची होती.
...
Powered By Sangraha 9.0