मानोरा,
Gopal Gawande honored रूईगोस्ता येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल गावंडे यांच्या हवामान अंदाज जागृतीसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कार्याची राज्यस्तरीय दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय उपक्रमांच्या आधारावर त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. ‘मदत सामाजिक संस्था’ तर्फे आयोजित तेवीसावे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन १६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, आगाराम देवी चौक, सुभाष रोड येथे पार पडले. या भव्य कार्यक्रमात गोपाल गावंडे यांचा आकर्षक स्मृतीचिन्ह, दुपट्टा, पुष्पगुच्छ आणि संविधानाचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. प्रकाश सोनक, कोषाध्यक्ष त्रिशरण पाटील, सचिव दिनेशबाबू वाघमारे यांच्या हस्ते हा सन्मान सोपविण्यात आला. अचूक हवामान अंदाज यासाठी गावंडे करत असलेल्या कामाला या पुरस्कारामुळे नवी उंची प्राप्त झाली आहे.