गोरेवाडा रिंग रोडवर होणार पादचारी पूल

20 Nov 2025 18:55:24
नागपूर,
Gorewada Ring Road नागरिकांना रस्ता ओलांडताना येत असलेल्या अडचणी घेता पादचारी पूल बांधल्या जाणार आहे. गोरेवाडा रोडवरील पलोटी हायस्कूल तसेच जरीपटका परिसरातील मार्टिन नगरजवळ पादचारी पूलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने पादचार्‍यांना रस्ता ओलांडताना होणार्‍या त्रासापासून सुटका होणार आहे.
 

Gorewada Ring Road 
 
रिंग रोडवरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने पादचारी ओव्हरब्रिज (एफओबी) बांधण्याचे ठरविले आहे. गोरेवाडा रोडवरील पलोटी हायस्कूलजवळ तसेच परिसरातील मार्टिन नगरजवळ पादचारी पूलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
गोरेवाडा रोडवर शाळांमुळे हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला शैक्षणिक संस्था आहेत. मार्टिननगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पलोटी स्कूल आणि मार्टिननगर चर्चकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना पादचारी पूल बांधण्यासाठी पत्र मिळाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यवहार्यता आणि गरजेचे करण्यासाठी ४-लेन रिंग रोडचे सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे दोन्ही पादचारी पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी निविदेत १२ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0