अवैध रेतीसह 40.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

20 Nov 2025 19:42:49
चंद्रपूर,
illegal sand transport Chandrapur अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्‍या व्यक्तीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत हायवा ट्रक व रेतीसह एकूण 40 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवार, 20 नोव्हेंबर रोजी रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
 

 illegal sand transport Chandrapur 
मिळालेल्या माहितीच्या illegal sand transport Chandrapur आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. यावेळी अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला हायवा पथकाने पकडला. रेती वाहतूक करणारा आरोपी रामभाऊ मारोती पेशने (55, रा. विसापूर, ता. बल्लारपूर) यास ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द रामनगर पोलिस ठाण्यात कलम 303 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता, सहकलम 48 (7), 48(8) मजमस सहकलम 177 मोवाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत 40 लाख रुपये किंमतीचा हायवा (एमएच 34 सीक्यु 7778), हायवा मधील 50 हजार रुपये किंमतीची 5 ब्रास रेती, 10 हजार रुपये किंमतीचा भ्रमणध्वनी असा एकूण 40 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दिपक कोक्रेडवार, पोलिस उप निरीक्षक संतोष निंभोरकर, हवालदार गणेश भोयर, अंमलदार प्रदीप मडावी, अजित शेंडे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0