गुगलचा अत्यंत महत्त्वाचा अलर्ट!

20 Nov 2025 14:16:10
नवी दिल्ली,
Important alert from Google गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक मोठा सुरक्षा धोका उघडकीस आला असून कंपनीने तातडीचा इशारा जारी केला आहे. जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर असलेल्या क्रोममध्ये एका नव्या शून्य-दिवस भेद्यतेचा शोध लागला आहे. CVE-2025-13223 असे नाव असलेल्या या गंभीर सुरक्षा त्रुटीचा प्रभाव जुन्या क्रोम आवृत्त्यांवर होत असून काही सायबर हल्लेखोरांनी या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्नही केला आहे.

google chrome 
ही त्रुटी क्रोममध्ये वापरल्या जाणाऱ्या V8 जावास्क्रिप्ट इंजिनमध्ये आढळली. या बगमुळे ब्राउझरला विशिष्ट प्रकारचा डेटा चुकीच्या पद्धतीने वाचला जाण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यातून मेमरी करप्ट होऊ शकते. परिणामी, हल्लेखोरांना वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर दुर्भावनापूर्ण कोड चालवण्याची संधी मिळू शकते. गुगलने स्पष्ट केले आहे की कंपनीला ही समस्या कळण्यापूर्वीच काही हॅकर्सनी तिचा गैरवापर करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. हा बग गुगलच्या थ्रेट अॅनालिसिस ग्रुपने १२ नोव्हेंबर रोजी शोधला असून २०२५ मधील हा सातवा शून्य-दिवस दोष ठरला आहे. याचा अर्थ हॅकर्सनी गुगलच्या आधी ही त्रुटी शोधली होती.
या पार्श्वभूमीवर, गुगलने तात्काळ कृती करत सुरक्षा पॅच जारी केला आहे. हा अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट केला जात आहे आणि तो ब्राउझरमध्ये उपलब्ध होताच त्वरित इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर क्रोमसह सर्व अॅप्स नियमितपणे अपडेट करून ठेवणे हीच सुरक्षिततेची सर्वात महत्त्वाची पायरी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0