महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

20 Nov 2025 18:01:39
नागपूर,
Maharashtra Temple Federation राज्यातील हिंदू मंदिरांच्या जमिनी भूमाफियां कडून हडप केल्याच्या वाढत्या घटनांवर तातडीने उपाययोजना करावी, तसेच महाराष्ट्रात “अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट” लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.
 
uma
 
 
मंदिरांच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशप्रमाणे स्वतंत्र कायदा आवश्यक असल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला येथे हडप झालेल्या मंदिर जमिनींबाबत कायदेशीर लढा सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.Maharashtra Temple Federation या मागण्यांसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) सचिन गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विविध देवस्थानांचे विश्वस्त, प्रतिनिधी तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य :उमाकांत रानडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0