आता, बंडखोरांच्या मनधरणीला प्राधान्य!

20 Nov 2025 19:49:46
सिंदीरेल्वे,
municipal election Sindhi Railway नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात आली आहे. शुक्रवार २१ रोजी उमेदवारी मागे घेण्याची शेवटली तिथी आहे. त्यापूर्वी बाधा ठरलेल्या उमेदवारांना आणि बंडोबांना शांत करणे किंवा मॅनेज करण्याची कसरत सुरू झाली आहे. प्रचाराला खरी सुरुवात शनिवार २२ रोजीपासून होईल.
 

municipal election Sindhi Railway 
 
तब्बल नऊ वर्षांनंतर होणार्‍या निवडणुकीत आजघडीला नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त सहा पक्षाचे आणि भाजपाच्या एका बंडखोराचा समावेश आहे. शहरात यंदा १७ ऐवजी २० नगरसेवक १२ हजार ३८८ मतदार निवड करणार आहे.
सध्या २० जागांसाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा महिला मतदार कोणत्या पक्षाला सहकार्य करतील, यावर सर्वांचे भवितव्य ठरणार आहे. सध्या, अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केल्याचे जाणवते. परंतु, नगराध्यक्षपदासाठी तुमचा उमेदवार कोण? हे विचारले की अपक्ष गप्प होताना दिसतात! भाजपा तसेच कांग्रेस व शरद पवार गटाने सर्व प्रभागात आपले उमेदवार दिले आहे. शहराच्या विकासासाठी सर्व उमेदवार आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत सुटले आहेत. मात्र, बहुमत नसेल तर मग काय? त्याचे उत्तर कोणी देत नाही. नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्ष विरुध्द शरद पवार गट अशी थेट लढत होण्याची चिन्ह आहेत. त्यातच दोन्ही महिला उमेदवार एकाच कुटुंबातील आणि एकाच जातीच्या असल्याने लढाई अटीतटीची होण्याची शयता आहे. इतरही उमेदवार एकाच समाजातील असल्यामुळे कोण कुणाला अंधारात मदत करेल, हे तुर्तास सांगता येत नाही.
Powered By Sangraha 9.0