नागपूर,
Congress बीएसपीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सागर लोखंडे, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत वाघमारे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. देवडिया काँग्रेस भवन, चिटणीस पार्क, महाल येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे तसेच आमदार अभिजीत वंजारी यांच्या उपस्थित हा पक्ष झाला. यावेळी दिनेश बानाबाकोडे, नाना झोडे, दीपक नागोसे, पृथ्वी मोटघरे, ज्ञानेश्वर ठाकरे आदी उपस्थित होते.