अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur cremation accident, वृद्ध महिला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारादरम्यान दहनघाटावर एक विचित्र घटना घडली. चिता चहुबाजुंनी जाळण्यासाठी एकाने चितेवर डिझेलचा मारा केला. मात्र, ते डिजेल चितेचे अंत्यदर्शन घेणाèया पाच नातेवाईकांच्या अंगावर उडाले. यात गंभीररित्या भाजलेल्या एकाचा मृत्यू झाला तर चाैघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार वाठाेडा दहनघाटावर घडला. विनाेद पुंडलिकराव मुनघाटे (60, कर्वेनगर, वर्धा मार्ग) असे जळून मृत पावलेल्याचे नाव आहे. तर अशाेक मुनघाटे (68, गाेपालनगर), साेपान गायकवाड (58, गराेबा मैदान), विठ्ठल भसारकर (70, जुनी मंगळवारी) आणि ज्ञानेश्वर गायकवाड (65,रामकृष्णनगर, वाठाेडा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नाेव्हेंबर राेजी सुशीलाबाई मुनघाटे (83, गाेपालकृष्ण लाॅनच्या मागे, वाठाेडा) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. दुपारी सर्व नातेवाईक अंत्यदर्शनासाठी आले हाेते. त्यांच्यावर वाठाेडा दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार हाेते. अंत्यसंस्कारादरम्यान विनाेद मुनघाटे हे चितेला अग्नी देण्यासाठी पुढे आले हाेते. त्यांच्या साेपान गायकवाड, अशाेक मुनघाटे, विठ्ठल भसारकर आणि ज्ञानेश्वर गायकवाड (65,रामकृष्णनगर, वाठाेडा) बाजूला उभे हाेते. चितेला चहुबाजून आग लावण्यासाठी चितेवर डिझेल ओतण्यात आले हाेते. त्यानंतर चिता पेटविण्यात आली. पण चिता व्यवस्थित न पेटल्यामुळे अचानक चितेवर डिझेल टाकण्यात आले. यादरम्यान, डाेळे लावून चितेचे अंत्यदर्शन घेणाèया पाचही जणांवर डिझेल उडाले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यात विनाेद यांच्यासह आणखी चार नातेवाईक भाजले व जखमी झाले. त्यांना अगाेदर मेडिकल रुग्णालायात नेण्यात आले. तेथून विनाेद यांना ऑरेंज सिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाचे साकेत अनिल गेडाम (36, सीताबर्डी) यांच्या सूचनेवरून वाठाेडा पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
जखमींची प्रकृती गंभीर
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार आकस्मिकपणे घडला आहे. त्यामुळे या प्रकरणी काेणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विनाेद मुनघाटे यांच्याबाबत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली. चार जणांवर अद्यापही उपचार सुरु असून त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती आहे.