नीतीश कुमार १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ

20 Nov 2025 11:48:58
पाटणा, 
nitish-kumar-sworn-as-chief-minister बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आणि जनता दल (संयुक्त) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या एका भव्य समारंभात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 
 
nitish-kumar-sworn-as-chief-minister
 
७४ वर्षीय नितीश कुमार पहिल्यांदा २००० मध्ये मुख्यमंत्री झाले, जरी त्यांचे सरकार फक्त आठ दिवस चालले. त्यानंतर त्यांनी २००५ ते २०१४ पर्यंत सतत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. nitish-kumar-sworn-as-chief-minister २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीनंतर, नितीश कुमार यांनी राजीनामा दिला परंतु काही महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा सत्तेत प्रवेश केला. जानेवारी २०२४ मध्ये, ते एनडीएमध्ये परतले आणि नवव्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आज त्यांनी १०व्यांदा शपथ घेतली.
यावेळी भाजपा नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीह. nitish-kumar-sworn-as-chief-minister पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीएचे अनेक प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मोहन यादव, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0