विज्ञान प्रदर्शनात पॅराडाईज स्कूलची प्रतिकृती राज्य पातळीवर

20 Nov 2025 18:00:02
आरमोरी, 
Paradise School Gadchiroli विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्यावतीने इन्स्पायर अवार्ड अंतर्गत गडचिरोली-चंद्रपूर जिल्हा दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन डॉ. कमल रणदिवे विज्ञान नगरी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात एकूण 190 प्रतिकृतींचा सहभाग होता. यातील उत्कृष्ट प्रतिकृती सादर केलेल्यांमध्ये कनिष्का के. कवंडर हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून, तिची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
 
 
gadachiroli
 
कनिष्काने केशवन कवडंर यांच्या मार्गदर्शनात एमसीएल प्रोजेक्ट नेपीयर ग्रास ही प्रतिकृती तयार केली. यामध्ये शेतकरी वर्षातून दोनदा उत्पन्न घेण्याकरिता धानाच्या शेतीसोबतच या नेपियर गवताची लागवड केल्यास शेतकर्‍यास अधिकचे उत्पन्न घेता येईल. तसेच या गवतापासून बायो कोल सुद्धा बनविले असून वीज निर्मिती करिता याचा वापर करता येईल व जमिनीच्या भूलगत कोळसा उत्खनन थांबवून देशाला भूकंपापासून वाचवता येईल. या प्रतिकृतीद्वारे कनिष्काने हे सिद्ध करून दाखविले आहे.
 
 
 
कनिष्का कवंडर व मार्गदर्शक शिक्षक यांचा शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, विवेक नाकाडे, शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाँखी, वरिष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, जिल्हाध्यक्ष मुकुंद मशाखेत्री, प्राचार्य धीरेंद्र आंबीलकर, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा आदींच्या हस्ते प्रमाणपत्र, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील डिफेन्स सर्विसेस जूनियर कॉलेज येथे राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन होत असून, यासाठी कनिष्काला मार्गदर्शक शिक्षक केशवन कवंडर, संस्थेचे अध्यक्ष गोविंदराजन कवंडर, विभाग प्रमुख विजयलक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापिका सुजाता मेहेर, सिंधू म्हशाखेत्री, मंजू सपाटे, रूपाली बडवाईक, प्रशांत कत्रे, होमराज माकडे, माधुरी वनवे, अस्मिता भोयर, प्रणाली सहारे, जयश्री वसाके, किरण झूरमुरे, रागिनी सहारे, ऐश्‍वर्या आखाडे, प्रिया रामटेके, भाग्यश्री उरकुडे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0